खंबाळे येथील आर.सी.पटेल माध्य. व उच्च. माध्य. विद्यालयांत आज दि.१५ ऑगस्ट २०१७ रोजी ''भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन'' मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहन खंबाळे गावातील प्रसिद्ध उद्योगपती श्री. राजुभाऊ गानु यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर विद्यालयातील एम.सी.सी.च्या पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या प्रसंगी काही विद्यार्थांनी देशभक्तीपर गितांचे गायन केले. त्यानंतर विद्यालयात शैक्ष. वर्ष २०१६-१७ मधील इ. १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकांनी ऊत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना मान्यवराच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.खाऊ वाटप केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करणयात आली.
काही क्षणचित्रे
काही क्षणचित्रे



No comments:
Post a Comment